इलॉन मस्क आणखी एका मोठा धमाका करण्याच्या तयारीत; सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती

मानवतेसाठी काम करणारं स्टार्टअप असं म्हटलं होतं. या स्टार्टअप अर्थात कंपनीला मस्कनं xAI असं नावही दिलं होतं.
इलॉन  मस्क आणखी एका मोठा धमाका करण्याच्या तयारीत; सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती

आर्टिफिशिअल इटेलिजन्स म्हणजेचं AI मुळे सगळं काम सोपं झालं आहे. आता AI या टूलमुळे अवघ्या जगात मोठी तंत्रज्ञानावर आधारित क्रांती होण्याच्या मार्गावर आहे. सगळीकडे सध्या याचं तंत्रज्ञानाची चर्चा सुरु आहे. ट्विटरची मालकी मिळाल्यापासून उद्योजक इलॉन मस्क याने त्यात अनेक महत्वपूर्ण बदल केले आहेत. आता तो यात आणखी एक मोठा बदल करण्याच्या तयारीत असल्याची माहित त्याने दिली आहे. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि अॅप देखील आपले स्वतंत्र एआय व्हजर्न लॉन्च करणार आहेत.

त्यातच आता सोशल मीडियातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या एक्सचा (ट्विटर) मालक इलॉन मस्कनं पहिल्या एआयची घोषणा केली आहे. उद्या एक्सचं हे एआय लॉन्च होणार आहे. इलॉन मस्कनं एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे.

यामध्ये त्यानं म्हटलं आहे की, उद्या विशिष्ट गटासाठी एक्सचं एआय लॉन्च होईल. सध्याच्या अस्तित्वात असलेल्या एआय सॉप्टवेअरपैकी हे सर्वोत्तम एआय असेल, असा दावा देखील इलॉन मस्क याने आपल्या पोस्टमधून केला आहे.

बिलेनिअर इलॉन मस्क यांची xAI ही आर्टिफिशिअल कंपनी उद्या आपलं पहिलं AI प्रोग्राम लॉन्च करणार आहे. पण हा प्रोग्राम मर्यादित क्षमतेत लॉन्च होणार आहे. याच वर्षी जुलै महिन्यात मस्कनं आपलं एआय स्टार्टअप सुरु केलं होतं. याला त्यानं मानवतेसाठी काम करणारं स्टार्टअप असं म्हटलं होतं. या स्टार्टअप अर्थात कंपनीला मस्कनं xAI असं नावही दिलं होतं.

logo
marathi.freepressjournal.in