उत्तर प्रदेशात ‘लव्ह जिहाद’, धर्मांतरप्रकरणी नवा कायदा

उत्तर प्रदेश विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ‘लव्ह जिहाद’ व धर्मांतराविरुद्ध नवीन कायदा मंजूर करण्यात आला असून यामुळे याप्रकरणी दोषी ठरलेल्यांना आजन्म कारावासाची तरतूद करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशात ‘लव्ह जिहाद’, धर्मांतरप्रकरणी नवा कायदा
File Photo
Published on

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ‘लव्ह जिहाद’ व धर्मांतराविरुद्ध नवीन कायदा मंजूर करण्यात आला असून यामुळे याप्रकरणी दोषी ठरलेल्यांना आजन्म कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. विधानसभेत ‘लव्ह जिहाद प्रतिबंधक’ विधेयक मंजूर करण्यात आले आहे. या नवीन कायद्यामुळे फसवणूक अथवा दबाव आणून धर्मांतर करण्यास भाग पाडणाऱ्यांवर कठोर कारवाई करता येणार आहे. या नवीन कायद्यामुळे हा गुन्हा गंभीर श्रेणीत वर्ग करण्यात आला आहे.

या नवीन कायद्यानुसार संबंधित आरोपीला कमीत कमी २० वर्षे तुरुंगवास अथवा आजन्म कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पीडित व्यक्तीचे पुनर्वसन व उपचारांच्या खर्चाची रक्कम दंडाच्या स्वरुपात निश्चित करण्यात येईल.

logo
marathi.freepressjournal.in