LPG Price Cut : व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात; आजपासून लागू होणार नवे दर

व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती कमी झाल्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी दिलासा मिळाला आहे.
LPG Price Cut : व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात; आजपासून लागू होणार नवे दर

मुंबई : मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. १ मेपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट झाली आहे. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत १९ रुपयांने कमी केले आहेत. तर, गॅस सिलिंडरचे नवीन दर हे आजपासून (१ मे) लागू होणार आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. यानुसार, दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमती ही आजपासून १,७४५.५० रुपयेऐवढी झाली आहे.

या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती कमी झाल्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी दिलासादायक मिळाला आहे. यापूर्वी मुंबईतील व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत १,७१७.५० रुपयांवरून आता १,६९८.५० रुपयांवर आली आहे. यापूर्वी चेन्नईमध्येही सिलिंडरची किंमत १,९३० रुपयांवरून १,९११ रुपयांवर आली आहे.

एप्रिल महिन्यातही व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमत घट

यापूर्वी, नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ एप्रिलला तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात करून व्यावसायिकांना मोठा दिलासा दिला होता. यानंतर दिल्लीत १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत ३०.५० रुपयांनी कमी होऊन १,७६४.५० रुपये झाली होता. तर, कोलकाता येथे व्यावसायिक सिलिंडरची किंमत ३२ रुपयांनी कमी होऊन १,८७९ रुपये झाली होती. मुंबईत सिलिंडरची किंमत ३१.५० रुपयांनी कमी होऊन १,७१७.५० रुपयांवर आली होती. चेन्नईमध्ये ३०.५० रुपयांनी कमी होऊन १,९३० रुपयांवर आली होती.

घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमत कपात नाही

व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमत हॉटेल आणि रेस्टॉरंट या व्यावसायिक कारणांसाठी कमी केल्या आहेत. ज्यामुळे खाणे-पिणे स्वस्त होईल. परंतु, घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात केली नाही. स्वयंपाक घरात १४.२ किलो एलपीजी सिलिंडरचा वापर केला जातो. या सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल केले नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in