LPG Price Slash : मोदी सरकारचा मोठा निर्णय! घरगुती गॅस सिलिंडवर २०० तर, उज्वला योजना लाभार्थ्यांना ४०० रुपयांची सूट

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली आहे.
LPG Price Slash : मोदी सरकारचा मोठा निर्णय! घरगुती गॅस सिलिंडवर २०० तर, उज्वला योजना लाभार्थ्यांना ४०० रुपयांची सूट

मोदी सरकारने ऐन रक्षाबंधनच्या तोंडावर नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवर २०० रुपयांची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.तर उज्वला योजनेच्या सिलिंडरवर ४०० रुपयांची सूट देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली आहे. या योजनेचा लाभ हा ७५ लाख उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना होणार आहे.

रक्षा बंधनाचा सण, काही राज्याच्यांच्या विधानसभेच्या निवडणुका आणि आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात महागाई कमी करण्यासंदर्भात विधान केलं होतं. त्यानुसार आता गॅस सिलिंडरच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. आगमी लोकसभेच्या आणि काही राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.

देशातील विरोधकांनी एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात 'इंडिया' या आघाडीची मोट बांधून मोदींशा शह देण्यासाठी रणनिती आखायला सुरुवात केली आहे. आता विरोधत महागाईच्या मुद्यावरुन केंद्रसरकारला कोंडीत पकडणार असल्याने सरकारने गॅससिलिंडरच्या किंमती दोनशे रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय उद्यापासून लागू होणार आहे. गॅस सिलिंडरच्या किंमतीत उद्यापासून(३० ऑगस्ट) सरसकट २०० रुपयांची कपात लागू केली आहे. तर उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ४०० रुपयांची सूट मिळणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in