चेन्नई: हॉटेलमध्ये अन्नपदार्थ बनवायला लागणारा गॅस उपलब्ध नसल्याने 'लाकडा'चा वापर करावा लागत आहे. त्यामुळे खर्च वाढल्याने हॉटेलमधील चमचमीत पदार्थ खायला आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. आज ईदच्या दिवशी बिर्याणी महाग झाल्याने उत्साहावर विरजण पडले आहे.
पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या एलपीजीच्या परिस्थितीमुळे रमजानच्या काळात कौटुंबिक मेळावे कमी झाल्याने मुस्लिम बांधवांनी खंत व्यक्त केली आहे. तमिळनाडू हॉटेल्स असोसिएशनचे अध्यक्ष एम. व्यंकडसुब्बू म्हणाले, यावेळी हॉटेल व्यावसायिकांनी बिर्याणीसोबतचे पदार्थही वापर करून लाकडाचा बनवण्यास पसंती दिली आहे. लोक जे काही अन्य पदार्थ मागवतील ते उपलब्ध असतील. कारण या काळात हॉटेल्सनी बिर्याणीसोबत ते पदार्थही लाकडावर बनवायला सुरुवात केली आहे. पण लाकडाचे भाव वाढल्याने त्याची किंमतही वाढली आहे. मात्र, हॉटेल्सनी तळलेले पदार्थ विकणे बंद केले आहे, असे ते म्हणाले.
अचानक व्यावसायिक उद्भवलेल्या एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्यामुळे ९० टक्के हॉटेल्स तोट्यात गेले आहेत, तर हॉटेल व्यवसायात ३० टक्के घट झाली. शनिवारी रमजान आल्याने ईदच्या काळात सर्वाधिक मागणी असलेल्या बिर्याणीचे भाव वाढवण्यात आले आहेत, कारण ती लाकडाच्या आगीवर बनवली जाते, असे हॉटेल्सनी सांगितले.
दुसरं म्हणजे, लाकडाच्या आगीवर बिर्याणी बनवणे ही पारंपरिक पद्धत होती, कारण एलपीजीवर बनवण्यापेक्षा त्यामुळे चव अधिक चांगली लागते. पण एलपीजी स्टोव्ह वापरात आल्यानंतर फार कमी लोक लाकडाच्या आगीवर बिर्याणी बनवत होते. ही पद्धत फक्त लग्नसमारंभात किंवा मोठ्या समारंभांमध्येच वापरली जात असे. आता हॉटेल्सनी लाकडाच्या आगीचा वापर सुरू केला आहे. लाकडाच्या किमती अनेक पटींनी वाढल्याने बिर्याणीची किंमतही वाढली आहे, असे एका सूत्राने सांगितले.
ते पुढे म्हणाले की, काही हॉटेल व्यावसायिकांनी यावेळी केंद्रीय स्वयंपाकघरात बिर्याणी बनवण्यास पसंती दिली आहे. कारण त्यामुळे वेळ, खर्च आणि लाकूड यांची बचत होते. केंद्रीय स्वयंपाकघरातून बिर्याणी वितरणासाठी इतर शाखांमध्ये नेली जाते, असे ते म्हणाले.
दरम्यान, पेरुंगुडीचे जुने रहिवासी हिदायतुल्ला खान यांनी सांगितले की, पूर्वी रमजानच्या काळात नातेवाईक आणि कुटुंबातील किमान ७ ते १० सदस्य एकाच ठिकाणी एकत्र येत असत आणि एकमेकांसोबत जेवण वाटून घेऊन सण साजरा करत असत. यंदा मात्र, नातेवाईक आणि इतरांच्या घरी जाण्याऐवजी, एलपीजीची टंचाई आणि किमतींमधील प्रचंड वाढ लक्षात घेऊन, केवळ दोन-तीन सदस्यांचे कुटुंब असलेल्यांनी आपापल्या घरीच कमी प्रमाणात बिर्याणी बनवली, असे ते म्हणाले.
दरम्यान, व्यंकटसुब्बू यांनी काही आकडेवारी सादर करताना सांगितले की, चेन्नईमध्ये व्यवसायात जवळपास ३० टक्क्यांची घट झाली आहे, तर तमिळनाडूच्या इतर भागांमध्ये व्यावसायिक एलपीजीच्या टंचाईमुळे व्यवसायावर १० टक्के परिणाम झाला आहे.
या महिन्यात परीक्षाही सुरू असल्याने हॉटेल्समध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत आणखी घट झाली आहे. येत्या काही दिवसांत ही परिस्थिती सुधारेल, असे वाटत नाही. लाकडाच्या किमती वाढल्या आहेत आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडर्सची टंचाई आहे. त्यामुळे भविष्यात खाद्यपदार्थांच्या किमती वाढतील, असे ते म्हणाले. दरम्यान, चेन्नईमधील एका लोकप्रिय रेस्टॉरंट साखळीच्या
आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी आता अन्न शिजवण्यासाठी 'इंडक्शन स्टोव्ह'चा वापर करण्यास सुरुवात केली आहे. आमच्या जवळपास सर्वच शाखांनी इंडक्शन स्टोव्ह वापरणे सुरू केले आहे. आम्ही आता सरपणाच्या लाकडाचा वापर करण्यासारख्या इतर पद्धतींकडेही वळत आहोत, असे ते म्हणाले.
ठराविक वेळेतच डोसा मिळणार
पूर्वी कोणत्याही वेळी 'डोसा' उपलब्ध असायचा. गॅस टंचाईमुळे आम्ही दुपारी १२ ते ३ या वेळेत डोसा बनवणे थांबवले आहे. चपात्या आणि परोठे मात्र उपलब्ध असतील, कारण ते मायक्रोवेव्हमध्ये पुन्हा गरम करून दिले जातात, असे एका हॉटेल व्यावसायिकाने सांगितले.