
लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांची संरक्षणदल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चौहान 2021 मध्ये सैन्यातून निवृत्त झाले आहेत. माजी संरक्षण प्रमुख बिपिन रावत आणि त्यांची पत्नी आणि इतर 11 जण नऊ महिन्यांपूर्वी विमान अपघातात मरण पावले. तेव्हापासून संरक्षण दलाचे प्रमुख पद रिक्त होते. दरम्यान, केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची देशाचे दुसरे संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.