लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी लष्कराचे नवे उपप्रमुख

लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी लेफ्टनंट जनरल एम. व्ही. सुचिंद्र कुमार यांच्याकडून पदभार स्वीकारला
लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी लष्कराचे नवे उपप्रमुख

नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सोमवारी भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. द्विवेदी यांना १९८४ साली भारतीय लष्कराच्या १८ जम्मू आणि काश्मीर रायफल्समधून सेवेला सुरुवात केली होती. तेव्हापासून विविध पातळीवर महत्त्वाच्या जबाबादाऱ्या पार पाडत त्यांना येथपर्यंत पदोन्नती मिळाली आहे. लष्कराचे उपप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारण्यापूर्वी लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी २०२२ ते २०२४ पर्यंत लष्कराच्या नॉर्दन कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून काम केले होते. लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी लेफ्टनंट जनरल एम. व्ही. सुचिंद्र कुमार यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यांची आता नॉर्दन कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in