Prabhakaran : मोठी बातमी! प्रभाकरन जिवंत असल्याचा तामिळ नेत्यांचा खळबळजनक दावा

लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमचा (LTTE) प्रमुख प्रभाकरन (Prabhakaran) जिवंत असल्याचा दावा केल्यामुळे आता अनेक प्रश्न उभे राहिले आहेत
Prabhakaran : मोठी बातमी! प्रभाकरन जिवंत असल्याचा तामिळ नेत्यांचा खळबळजनक दावा

लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमचा (LTTE) प्रमुख वेलुपिल्लई प्रभाकरन (Prabhakaran) जिवंत आहे, असा दावा तमिळ संघटनांच्या जागतिक महापरिषदेचे अध्यक्ष पी नेदूमारन (P. Nedumaran) यांनी तमिळनाडूच्या तंजावरमध्ये एक निवेदन जारी करून केला आहे. देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करण्यामध्ये त्याचा सहभाग होता. १८ मे २००९मध्ये श्रीलंकाच्या सैन्यासोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, आता तो जिवंत असून सुखरूप असल्याचा दावा केल्यामुळे आता अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.

प्रभाकरन जिवंत असून योग्य वेळ आल्यावर तो जगासमोर येईल, असे नेदुमारन यांनी सांगितले आहे. तसेच, त्यांनी तामिळनाडू सरकार, पक्ष आणि तामिळनाडूतील जनतेला प्रभाकरनच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहनदेखील केले आहे. आपण प्रभाकरनच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असल्याचेही या नेत्याने सांगितले. २००९मध्ये श्रीलंकन ​​लष्कराने केलेल्या लष्करी कारवाईदरम्यान प्रभाकरन मारला गेल्याची माहिती माध्यमांना देण्यात आली होती. पण आता केलेल्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. "प्रभाकरन लवकरच तामिळ वंशाच्या मुक्तीसाठी योजना जाहीर करणार आहे. जगातील सर्व तमिळ जनतेने संघटित होऊन त्याला पाठिंबा द्यावा," असे आवाहनही नेदुमारन यांनी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in