माधबी पुरी बुच यांना क्लीन चिट

‘सेबी’च्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना लोकपालने हिंडेनबर्ग प्रकरणी क्लीन चिट दिली आहे. लोकपालने माधवी पुरी बुच यांच्याविरुद्धच्या तक्रारी निकाली काढत त्यांच्यावरील आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.
माधबी पुरी बुच यांना क्लीन चिट
Published on

मुंबई : ‘सेबी’च्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना लोकपालने हिंडेनबर्ग प्रकरणी क्लीन चिट दिली आहे. लोकपालने माधवी पुरी बुच यांच्याविरुद्धच्या तक्रारी निकाली काढत त्यांच्यावरील आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.

सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांच्यावर हिंडेनबर्गने गंभीर आरोप केले होते. त्यांचे अदानी समूहासोबत संबंध आहेत, असा आरोपही त्यांच्यावर लावण्यात आला होता. लोकपालच्या भ्रष्टाचार विरोधी संस्थेने हिंडेनबर्ग प्रकरणात त्यांच्याविरुद्धच्या सर्व तक्रारी फेटाळून लावल्या आहेत. तसेच माधवी बुच यांच्याविरुद्ध चौकशीचे आदेश देण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे नाहीत, असेही लोकपालने म्हटले आहे. लोकपालांनी म्हटले की, “सादर करण्यात आलेली साक्ष आणि कायद्याच्या कसोटीवर ही तक्रार टिकणारी नाही. आणि त्यातून कोणताही गुन्हा किंवा तपास केला पाहिजे, असे सिद्ध होत नाही.”

ऑगस्ट २०२४ मध्ये हिंडेनबर्ग यांनी एका अहवालात दावा केला होता की, सेबी प्रमुख माधवी पुरी बुच आणि त्यांच्या पतीचा अदानी ग्रुपच्या परदेशी निधीमध्ये हिस्सा आहे. अहवालात अदानी ग्रुपवर संगनमताचा आरोपही करण्यात आला होता. त्याच वेळी, बुच यांनी हे आरोप ‘निराधार’ आणि ‘चारित्र्यहनन’ असल्याचे म्हटले होते.

logo
marathi.freepressjournal.in