मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय सोमवारी? केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजप आमदारांची बैठक

या निरीक्षकांच्या उपस्थितीत सोमवारी नवनियुक्त आमदारांची बैठक होईल. बैठकीची वेळ अद्याप निश्चित झालेली नाही.
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय सोमवारी?
केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजप आमदारांची बैठक

भोपाळ : मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय सोमवारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात नुकत्याच निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या १६३ आमदारांची सोमवारी पक्षाच्या निरीक्षकांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशात १७ नोव्हेंबर विधानसभा निवडणूक पार पडली. तिचा निकाल गेल्या रविवारी जाहीर झाला. त्यात भाजपने २३० पैकी तब्बल १६३ जागा जिंकल्या आणि काँग्रेसला ६६ जागा मिळाल्या. त्यानंतर भाजपच्या मंत्रिमंडळ स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या. पक्षाने शुक्रवारी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, ओबीसी मोर्चा प्रमुख के. लक्ष्मण आणि सचिव आशा लाक्रा यांची मध्य प्रदेशातील विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्यासाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली.

या निरीक्षकांच्या उपस्थितीत सोमवारी नवनियुक्त आमदारांची बैठक होईल. बैठकीची वेळ अद्याप निश्चित झालेली नाही. पण सोमवारी सायंकाळी साधारण ५ ते ७ या वेळेत बैठक होणे अपेक्षित आहे. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होईल, असे भाजप मीडिया सेलचे प्रमुख आशिष अग्रवाल यांनी शनिवारी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in