मोबाईलवर बोलत गाडी चालवणाऱ्याला ट्रॅफिक पोलिसाने रोखलं; पण चालकाने गाडी अंगावर घातली आणि...

मध्य प्रदेशमधील एक व्हिडीओ सध्या तुफान वायरल होत असून ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्यावर केलेल्या या कृत्याचा देशभरातून निषेध होत आहे
मोबाईलवर बोलत गाडी चालवणाऱ्याला ट्रॅफिक पोलिसाने रोखलं; पण चालकाने गाडी अंगावर घातली आणि...
Published on

मध्य प्रदेशमधील इंदोरमध्ये एका चालकाला पोलीस कर्मचाऱ्याने मोबाइल फोनवर बोलत असल्याने रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर जे घडलं ते सर्वांसाठी धक्कादायक होते. कारण, त्याच्या या कृत्यामुळे संतप्त झालेल्या चालकाने गाडी थेट पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावरच घातली आणि त्याला तब्बल ४ किमी फरफटत घेऊन गेला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला आहे. यानंतर अनेकांनी चालकावर टीका करत पोलीस कर्मचाऱ्याने आपले काम चोख पार पाडण्यासाठी कौतुकदेखील केले आहे.

वाहतूक पोलीस कर्मचारी शिव सिंग चौहान यांनी मोबाईलवर बोलता असलेल्या चालकाला थांबवले. त्याला दंड भरण्यास सांगण्यात आल्यावर चालकाने गाडी सुरु केली आणि पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली. यावेळी पोलीस कर्मचाऱ्याने बोनेटवर चढून त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. पण चालकाने गाडी न थांबवता त्याला ४ किमीपर्यंत फरफटत घेऊन गेला. चालकाला रोखण्यासाठी इतर पोलिसांनी अखेर गाडीला घेरले आणि त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्या चालकांकडून पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हरदेखील जप्त करण्यात आली. या शस्त्रांचा परवाना असल्याचा दावा चालकाने केला आहे. सध्या पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in