

मदुराई : तमिळनाडूतील कार्तिकाई दीप प्रकरणात अनावश्यक राजकारण केले जात असल्याचे स्पष्ट करून मद्रास उच्च न्यायालयाने मंगळवारी एकल खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत टेकडीवर दीप प्रज्वलित करण्यास परवानगी दिली. दिवा खांब दर्ग्याचा आहे, असा युक्तिवाद वक्फच्या वतीने करण्यात आला होता.
हिंदू तमिळ पक्षाचे नेते रामा रविकुमार यांनी मद्रास उच्च न्यायालयात टेकडीवरील स्तंभावर कार्तिकाई दीपम लावण्याची परवानगी मागणारी याचिका दाखल केली. न्यायमूर्ती जी. जयचंद्रन आणि के. के. रामकृष्णन यांनी याचिकेवरील निर्णयात परवानगी दिली. जिल्हा प्रशासनाने दोन्ही समुदायांमधील संवादाद्वारे हा प्रश्न सोडवावा, टेकडी हे एक संरक्षित क्षेत्र आहे आणि कायद्यातील तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे, असे मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले आहे.