
प्रयागराज : येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात बुधवारी मौनी अमावास्येनिमित्त शाही स्नान होणार आहे. या शाही स्नानासाठी कोट्यवधी भाविक प्रयागराजला दाखल हात आहेत. महाकुंभ मेळा सुरू झाल्यानंतर प्रयागराजमध्ये आतापर्यंत १७ कोटी भाविकांनी स्नान केले आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या आकडेवारीनुसार, बुधवारी दुपारी २ वाजेपर्यंत २.३९ कोटी लोकांनी संगमात डुबकी मारली. मौनी अमावास्येनिमित्त महाकुंभ मेळा येथे आखाड्यांचे सात तास शाही स्नान चालणार आहे. महानिर्वाणी ते निर्मला आखाड्यापर्यंत व नागा साधू-संत शाही स्नान करणार आहेत. या शाही स्नानासाठी प्रशासनाने चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे.
रेल्वेत मोठी गर्दी
शाही स्नानासाठी देशभरातून कोट्यवधी भाविक प्रयागराजला पोहचत आहेत. त्यामुळे लखनऊ रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी जमली आहे. कितीही गर्दी असली तरीही आम्ही प्रयागराजला जाऊन संगमावर स्नान करणार, असे भाविकांनी सांगितले.