महादेव ॲप मनी लाँड्रिंग : हवाला ऑपरेटरची ५८० कोटींची मालमत्ता गोठवली

महादेव ॲप मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी छापे टाकून दुबईस्थित हवाला ऑपरेटरची ५८० कोटी रुपयांची मालमत्ता गोठविली आणि...
महादेव ॲप मनी लाँड्रिंग : हवाला ऑपरेटरची ५८० कोटींची मालमत्ता गोठवली

नवी दिल्ली : महादेव ॲप मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी छापे टाकून दुबईस्थित हवाला ऑपरेटरची ५८० कोटी रुपयांची मालमत्ता गोठविली आणि ३.६४ कोटी रुपयांची रोख रक्कम आणि मौल्यवान ऐवज जप्त केला.

मुंबईसह कोलकाता, गुरुग्राम, दिल्ली, इंदूर आणि रायपूर येथील विविध संकुलांवर २८ फेब्रुवारी रोजी ईडीने छापे टाकले. महादेव ऑनलाईन गेमिंग आणि बेटिंगप्रकरणी तपास केला असता असे आढळले की, छत्तीसगढमधील दिग्गज राजकीय नेते आणि बडे अधिकारी यांचा त्यामध्ये सहभाग आहे. या ॲपचे दोन प्रवर्तक हे याच राज्यातील आहेत, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणले.

या प्रकरणातील हवाला ऑपरेटरचे नाव हरिशंकर तिबरेवाल असे असून तो मूळचा कोलकाता येथील आहे, मात्र सध्या तो दुबईत वास्तव्याला आहे. तिबरेवाल आणि त्याचे साथीदार यांच्याशी संबंधित संकुलांवर छापे टाकण्यात आले आहेत.

तिबरेवाल याची महादेव ॲपच्या प्रवर्तकांशी भागीदारी असून तिबरेवाल याचा स्वत:च्या मालकीचा स्कायएक्स्चेंज ॲपही आहे. तिबरेवाल हा दुबईहून भारतीय शेअर बाजारात गुंत‌वणूक करीत होता. त्याने आपल्या कंपन्यांमध्ये अनेक साथीदारांना संचालक म्हणून नियुक्त केले आहे. या कंपन्या शेअर बाजारात गुंतवणूक केल्याचा आरोप ईडीने केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in