महादेव ॲप घोटाळा : नेत्यांची नावे देण्यास सौरभ चंद्राकर तयार

बहुचर्चित महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप प्रकरणातील मुख्य सूत्रधार सौरभ चंद्राकर याने संपूर्ण सट्टेबाजी रॅकेटचा पर्दाफाश करण्याची तयारी दर्शवली आहे.
महादेव ॲप घोटाळा : नेत्यांची नावे देण्यास सौरभ चंद्राकर तयार
महादेव ॲप घोटाळा : नेत्यांची नावे देण्यास सौरभ चंद्राकर तयार
Published on

मुंबई : बहुचर्चित महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप प्रकरणातील मुख्य सूत्रधार सौरभ चंद्राकर याने संपूर्ण सट्टेबाजी रॅकेटचा पर्दाफाश करण्याची तयारी दर्शवली आहे. या नेटवर्कमधील राजकीय पाठीराखे, मध्यस्थ, आर्थिक व्यवहार आणि परदेशातील मालमत्तांची माहिती उघड करण्याच्या बदल्यात त्याने भारत सरकारकडे साक्षीदार संरक्षण व्यवस्थेची मागणी केली आहे.

सध्या ओमानमधील अल खौद स्थानबद्धता केंद्रात असलेल्या चंद्राकरने आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. छत्तीसगडमधील एका बड्या राजकीय नेत्याकडून आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून थेट हल्ला होण्याची भीती त्याने व्यक्त केली आहे. भारतीय तपास यंत्रणांना सहकार्य करण्यास हरकत नसल्याचे सांगतानाच, योग्य सुरक्षा मिळाल्याशिवाय थेट भारताच्या हवाली करू नये, अशी विनंती त्याने ओमान प्रशासनाला केली आहे.

चंद्राकरकडे दुबई आणि ब्रिटनमधील बेनामी मालमत्तांची माहिती असल्याचा दावा करण्यात येत आहे. सध्या ओमानची न्यायालये रेड कॉर्नर नोटिशीच्या आधारे भारतीय यंत्रणांनी पाठवलेल्या प्रत्यार्पण अर्जाची आणि पुराव्यांची कायदेशीर चौकशी करत आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in