Mahant Satyendra Das : राम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांचे निधन; मेंदूतील रक्तस्त्रावानंतर सुरु होते उपचार

अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांचे आज बुधवारी (दि,१२) सकाळी संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (SGPGI) येथे निधन झाले. ते ८५ वर्षाचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांना उपचारासाठी SGPGI मध्ये दाखल करण्यात आले होते.
Mahant Satyendra Das : राम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांचे निधन; मेंदूतील रक्तस्त्रावानंतर सुरु होते उपचार
Mahant Satyendra Das : राम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांचे निधन; मेंदूतील रक्तस्त्रावानंतर सुरु होते उपचार@kpmaurya1
Published on

अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांचे आज बुधवारी (दि,१२) सकाळी संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (SGPGI) येथे निधन झाले. ते ८५ वर्षाचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांना उपचारासाठी SGPGI मध्ये दाखल करण्यात आले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

रिपोर्टनुसार, महंत सत्येंद्र दास हे मधुमेह आणि उच्चरक्तदाबाने ग्रस्त होते. त्यांना ३ फेब्रुवारीला मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने लखनऊ येथील SGPGI येथील न्यूरोलॉजी वॉर्डच्या हाय डिपेंडन्सी युनिट (HDU) मध्ये दाखल करण्यात आले होते. न्यूरोलॉजी विभागाच्या वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या मृत्यूवर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोशल मीडिया पोस्टवर म्हटले आहे,''भगवान रामाचे महान भक्त आणि श्री रामजन्मभूमी मंदिर, श्री अयोध्या धामचे मुख्य पुजारी आचार्य श्री सत्येंद्र कुमार दास जी महाराज यांचे निधन अत्यंत दुःखद आणि आध्यात्मिक जगताचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. विनम्र श्रद्धांजली! आम्ही प्रभू श्रीरामांना प्रार्थना करतो की त्यांनी दिवंगत आत्म्याला त्यांच्या चरणी स्थान द्यावे आणि त्यांच्या शोकाकुल शिष्यांना आणि अनुयायांना हे मोठे नुकसान सहन करण्याची शक्ती द्यावी. ओम शांती.''

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्टवर म्हटले आहे, ''श्री रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी आणि भगवान श्रीरामांचे निस्सीम भक्त आचार्य सत्येंद्र दास जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. श्री रामजन्मभूमी चळवळीपासून श्रीराम लल्लाच्या पुनर्स्थापनेपर्यंत त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे जे येणाऱ्या पिढ्यांना नेहमीच प्रेरणा देईल. त्यांचे निधन संत समुदाय आणि आध्यात्मिक जगतासाठी कधीही भरून न येणारे नुकसान आहे. मी भगवान श्रीरामांना प्रार्थना करतो की त्यांनी त्या पुण्यवान आत्म्याला आपल्या चरणी स्थान द्यावे आणि शोकाकुल अनुयायांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी. ओम शांती!''

logo
marathi.freepressjournal.in