साडेतीन शक्तीपीठे आणि नारी शक्ती यांचा गौरव, महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक

उत्तराखंडच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. 17 राज्यांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे
साडेतीन शक्तीपीठे आणि नारी शक्ती यांचा गौरव, महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक

प्रजासत्ताक दिनी परेडमध्ये सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्र चित्ररथला दुसरा क्रमांक मिळाला आहे. साडेतीन शक्तीपीठे आणि नारी शक्ती यांचा गौरव करणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक मिळाला आहे. उत्तराखंडच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. 17 राज्यांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तराखंडचा चित्ररथ पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक मिळाला आहे. साडेतीन शक्तीपीठे आणि स्त्रीशक्ती जागर यावर आधारित चित्ररथ होता. संबळ हे गोंधळ्यांचे मुख्य वाद्य आहे. तुळजाभवानीचा हा गोंधळ चित्ररथासमोर आहे. त्याच्या मागे कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणी या साडेतीन शक्तीपीठांचा देखावा दाखवला आहे. ही सर्व शक्तीपीठे म्हणजे स्त्रीशक्तीचा मान आहे. एकूणच महाराष्ट्रातील लोककला या ठिकाणी सादर करण्यात आल्या.

logo
marathi.freepressjournal.in