मूर्खांना म्हणी पण कळत नाहीत; शहांवरील वादग्रस्त विधानानंतर मोईत्रांची टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरुद्ध केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल छत्तीसगडमधील रायपूर येथे तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अमित शहा यांचे शीर धडापासून वेगळे करून ते टेबलावर ठेवले पाहिजे, असे विधान महुआ मोइत्रांनी केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला.
मूर्खांना म्हणी पण कळत नाहीत; शहांवरील वादग्रस्त विधानानंतर मोईत्रांची टीका
Published on

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरुद्ध केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल छत्तीसगडमधील रायपूर येथे तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अमित शहा यांचे शीर धडापासून वेगळे करून ते टेबलावर ठेवले पाहिजे, असे विधान महुआ मोइत्रांनी केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. मात्र आता टीएमसी खासदाराने या बाबत स्पष्टीकरण देत भाजपवर टीका केली. मूर्खांना म्हणीही समजत नाही, असे महुआ मोइत्रा म्हणाल्या.

घुसखोरीच्या मुद्द्यावरुन केंद्रावर टीका करताना महुआ मोइत्रा यांनी हे विधान केल्याचे म्हटले जात आहे. घुसखोर देशात येत आहेत आणि महिलांच्या प्रतिष्ठेचा अपमान करत आहेत. जर गृहमंत्री घुसखोरांपासून देशाचे रक्षण करू शकत नसतील तर त्यांचे डोके कापून टेबलावर ठेवले पाहिजे, असे विधान मोइत्रांनी केले होते. त्या विरोधात भाजपने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

माझ्या शब्दांमुळे गैरसमज

मोइत्रा यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, ही फक्त एक म्हण आहे आणि माझ्या शब्दांमुळे गैरसमज झाला आहे. मूर्खांना म्हणीसुद्धा समजत नाहीत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर, परदेशी माध्यमांनी २४० जागा ही मोदींच्या तोंडावर थप्पड आहे असे म्हटले. मग कोणीतरी जाऊन मोदींना ती मारली का, असे त्यांनी विचारले.

logo
marathi.freepressjournal.in