नवी दिल्ली : खासदार महुआ मोईत्रा यांनी पैशासाठी देशाची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आणली, असा आरोप भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला.दर्शन हिरानंदानी यांच्या प्रतिज्ञापत्रावरून भाजप व तृणमूलच्या खासदारांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले.
दुबे यांनी दावा केला की, महुआ मोईत्रा या भारतात असताना त्यांच्या संसदीय आयडीचा वापर दुबईत केला गेला. याबाबत राष्ट्रीय विज्ञान केंद्राने तपास संस्थेला माहिती दिली आहे. दुबे यांनी आपल्या पोस्टमध्ये मोईत्रा यांच्या नावाचा उल्लेख केला नाही, तसेच कोणत्या तपास यंत्रणेला माहिती दिली, हे सांगितले नाही.
लोकपालकडे केली तक्रार
सीबीआय-सीबीआय ऐकून थकलो आहे. आज मी लोकपालकडे तक्रार दिली. खासदार, मंत्र्यांचा भ्रष्टाचार हा लोकपालच बघतात. सीबीआय त्याचे माध्यम आहे, असे दुबे म्हणाले. खासदार दुबे यांनी माहिती फोडल्याचा आरोप मोईत्रा यांनी केला. त्या म्हणाल्या की, एनआयसीने सार्वजनिकरीत्या सर्व माहिती जाहीर करावी.