तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबचा ठराव मंजूर झाल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही घोषणा केली आहे. खासदार निशिकांत दुबे यांनी महुआ मोइत्रा यांच्यावर आरोप केले होते. यात नीतिमत्ता समितीच्या तपासात तथ्य आढळल्याने मोइत्रा यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती ओम बिर्ला यांनी दिली आहे.
खासदार शसिकांत दुबे यांनी पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप केला होता. मोइत्रा यांच्याकडून मात्र हे सर्व आरोप फेटाळण्यात आले होते. मात्र उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांनी आपण संसदेचं लॉगइन आणि पासवर्ड दिल्याची कबुली दिली होती. याच बरोबर या पोर्टलवरुन कुणालाही लॉगइन करता येईल, कोण करु शकेल आणि कोण करु शकत नाही, असा कसलाही नियम नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र नीतिमत्त समितीने आज संसदेत आपला अहवाल सादर करत महुआ मोइत्रा यांचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव मांडला, त्याला मंजुरी देण्यात आली आहे.
नीतिमत्ता समितीचा अहवाल
लोकसभेच्या नीतिमत्ता समितीने मोईत्रा यांच्याबाबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या आदेशानंत हा चौकशी अहवाल तयार केला होता. ५०० शब्दांचा हा अहवाल ६-४ अशा फरकाने मंजूर करण्यात आला आहे. यात मोइत्रा यांच्यावरील आरोपहे गंभीर आणि अनैतिक असल्याचं म्हटलं आहे. तसंच समितीने सखोल चौकशी अहवाल येईपर्यंत महुआ मोइत्रा यांचं सदस्यत्व रद्द करण्याची किंवा त्यांना निलंबीत करण्याची शिफारस केली आहे.
महुआ मोइत्रा यांची प्रतिक्रिया
महुआम मोइत्रा यांनी लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्याच्या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, "माझ्याविरोधात कोणताही पुरावा नाही. मी संसदेत गौतमी अदानी यांचा मुद्दा उपस्थित केला होता आणि भविष्यात देखील मी त्यावर बोलणार आहे. केवळ संसदेचं लॉगइन आणि पासवर्ड शेअर केल्यामुळे माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, त्याबाबत कोणताही संसदीय नियम नाही."
दरम्यान, महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयानंतर विरोधी पक्षातील खासदारांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करच वॉकआऊट केलं.