महुआ मोईत्रांचे सरकारच्या नोटिशीला आव्हान

मोईत्रा यांनी गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयापुढे वैद्यकीय कारणांचा हवाला देत सरकारी बंगल्यातून बाहेर काढण्यासंबंधातील निर्णयापासून अधिकाऱ्यांना रोखावे
महुआ मोईत्रांचे सरकारच्या  नोटिशीला आव्हान
PM

नवी दिल्ली : लोकसभेतून हकालपट्टी केलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्यांनी सरकारी बंगला रिकामा करण्यासाठी इस्टेट संचालनालयाने दिलेल्या नोटीसला आव्हान दिले. सदर बंगला मोईत्रा यांच्या हकालपट्टीनंतर तो रद्द करण्यात आला. त्यामुळे बेदखल नोटिसीविरोधात मोईत्रा यांच्या याचिकेवर न्यायाधीश गिरीश कथपालिया लवकरच सुनावणी करणार आहेत. बंगला त्वरित रिकामा करण्यास सांगणारी नोटीस मंगळवारी त्यांना बजावण्यात आली. गेल्या वर्षी ८ डिसेंबर रोजी लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आलेल्या मोईत्रा यांना वाटप रद्द झाल्यानंतर ७ जानेवारीपर्यंत घर रिकामे करण्यास सांगण्यात आले होते. गैरवर्तन केल्याबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आले आणि व्यावसायिक प्रतिस्पर्धी गौतम अदानी यांना लक्ष्य करत प्रश्न विचारल्याच्या बदल्यात व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून भेटवस्तू आणि इतर उपहार स्वीकारल्याबद्दल त्यांना सभागृहातून काढून टाकण्यात आले होते.

दरम्यान, मोईत्रा यांनी गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयापुढे वैद्यकीय कारणांचा हवाला देत सरकारी बंगल्यातून बाहेर काढण्यासंबंधातील निर्णयापासून अधिकाऱ्यांना रोखावे, अशी विनंती केली. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे न्यायालयाने त्यांना बंगला रिकामा करण्यासाठी थोडा वेळ द्यावा, शक्यतो चार महिने द्यावेत, असेही गुप्ता यांनी न्यायालयाला सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in