ख्रिसमस सेलिब्रेशनवेळी मोठी दुर्घटना, एकाचवेळी अनेकजण चढल्याने पूल कोसळला; अनेक लोक जखमी

धबधबा आणि येशूचा जन्मसोहळा तसेच इतर सजावट पाहण्यासाठी भिंत ओलांडून पलीकडे जाण्यासाठी हा पूल बांधण्यात आला
ख्रिसमस सेलिब्रेशनवेळी मोठी दुर्घटना, एकाचवेळी अनेकजण चढल्याने पूल कोसळला; अनेक लोक जखमी
PM

केरळची राजधानी तिरुवनंतपुरममध्ये नेयट्टींकाराजवळ पूवर येथे सोमवारी रात्री ख्रिसमसच्या सेलिब्रेशनदरम्यान मोठी दूर्घटना घडली. येथे ख्रिसमसच्या निमित्ताने उभारण्यात आलेला एक तात्पुरता पूल कोसळला. अनेकजण एकाचवेळी या पूलावर चढल्याने भार न सहन झाल्याने पूर कोसळला.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात 7-8 जण जखमी झाले आहेत .त्यापैकी काहींना गंभीर दुखापत झाली आहे, तर एका महिलेचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.

हा अपघात रात्री 9 च्या सुमारास झाला. त्यावेळी अनेक लोक एकाच वेळी पुलावर चढल्याने जास्त भारामुळे पूल एका बाजूला झुकला आणि कोसळला. त्यासोबतच पूलावर उभे असलेले लोक खाली पडले.

ख्रिसमसच्या उत्सवाचा एक भाग म्हणून हा तात्पुरता पूल उभारण्यात आला होता. धबधबा आणि येशूचा जन्मसोहळा तसेच इतर सजावट पाहण्यासाठी भिंत ओलांडून पलीकडे जाण्यासाठी हा पूल बांधण्यात आला होता. पूलाची उंची सुमारे पाच फूट होती. एकावेळी मोजक्याच लोकांना जाता येईल, इतकी पूलाची क्षमता होती. मात्र, अनेकजण एकत्र पुलावर चढले. त्यामुळे अपघात झाला, जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in