प्रियांकांच्या गालासारखे रस्ते बनवू! भाजप उमेदवाराच्या वक्तव्याने नवा वाद

रमेश बिधुरी व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत - लालूंनी वचन दिले होते की ते बिहारचे रस्ते हेमा मालिनी यांच्या गालासारखे बनवतील, पण ते तसे करू शकले नाहीत.
प्रियांका गांधी, रमेश बिधुरी (डावीकडून)
प्रियांका गांधी, रमेश बिधुरी (डावीकडून)
Published on

नवी दिल्ली : रमेश बिधुरी व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत - लालूंनी वचन दिले होते की ते बिहारचे रस्ते हेमा मालिनी यांच्या गालासारखे बनवतील, पण ते तसे करू शकले नाहीत. मी तुम्हाला आश्वासन देतो, ज्याप्रमाणे मी ओखला आणि संगम विहारचे रस्ते बनवले, त्याचप्रमाणे मी कालकाजीतील सर्व रस्ते प्रियांका गांधींच्या गालासारखे बनवेन, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे दिल्लीतील उमेदवार रमेश बिधुरी यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेस नेते पवन खेडा यांनी दिल्लीतील भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ जारी केला आहे. पवन खेडा म्हणाले की, हे गैरवर्तन या माणसाची मानसिकता दर्शवत नाही, तर हे त्याच्या मालकांचे वास्तव आहे. यावरून तुम्हाला भाजपच्या या नीच नेत्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मूल्ये दिसतील.

logo
marathi.freepressjournal.in