मल्याळी अभिनेते विनोद थॉमस यांचे निधन

विनोद थॉमस यांचा भगवान दसंते रामराज्यम हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता.

कोट्टायम : प्रसिद्ध मल्याळी चित्रपट अभिनेते विनोद थॉमस यांचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या ४५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोट्टायम येथील पंपाडीजवळ एका हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये विनोद यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी विनोद थॉमस यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, आम्ही विनोद यांना जवळच्या रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. विनोद थॉमस यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.’ विनोद थॉमस हे मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. विनोद यांनी ‘अयप्पनम कोश्युम, नाथोली ओरू चेरिया मीनाल्ला, ओरू मुराई वंथ पथया, हॅपी वेडिंग आणि जून यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारली होती. विनोद थॉमस यांचा भगवान दसंते रामराज्यम हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता.

logo
marathi.freepressjournal.in