गो-एअरच्या दोन विमानांमध्ये बिघाड,डीजीसीएकडून चौकशी सुरु

इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ते दिल्लीकडे वळवण्यात आले आहे.
गो-एअरच्या दोन विमानांमध्ये बिघाड,डीजीसीएकडून चौकशी सुरु

देशात विमानांमध्ये बिघाड होण्याचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत. एकामागून एक अशा अनेक घटनांनंतर आता गो-एअरच्या दोन विमानांमध्ये गडबड झाल्याच्या बातम्या मंगळवारी समोर आल्या आहेत.

डीजीसीएने मंगळवारी सांगितले की, गोएअरचे फ्लाइट A320 फ्लाइट क्रमांक G8-386, जे मुंबईहून लेहला जात होते, इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ते दिल्लीकडे वळवण्यात आले आहे. विमानाच्या दोन क्रमांकाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे.

डीजीसीएच्या म्हणण्यानुसार, गो एअर चे दुसरे फ्लाइट क्रमांक G8-6202, जे श्रीनगरहून दिल्लीला जात होते, ते देखील इंजिन क्रमांक दोनमध्ये बिघाड झाल्याने श्रीनगरला परत आले आहे.

डीजीसीएने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, आम्ही दोन्ही प्रकरणांची चौकशी करत आहोत. दोन्ही विमानांच्या उड्डाणावर सध्या बंदी घालण्यात आली आहे. डीजीसीएकडून मंजुरी मिळाल्यानंतरच दोन्ही विमाने उड्डाण करू शकतील.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in