काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे विजयी

मल्लिकार्जुन खर्गे यांना 7897 तर शशी थरूर यांना 1072 मते मिळाली. 24 वर्षानंतर काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष मिळाला
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे विजयी

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांचा अखेर विजय झाला आहे. 17 ऑक्टोबर रोजी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत देशभरातील काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांनी मतदान केले. मल्लिकार्जुन खर्गे यांना 7897 तर शशी थरूर यांना 1072 मते मिळाली. 24 वर्षानंतर काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष मिळाला. यापूर्वी गांधी घराण्याव्यतिरिक्त सीताराम येचुरी अध्यक्ष होते.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील हा नेतृत्वबदल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यात अध्यक्षपदासाठी लढत होती. शशी थरूर यांनी ट्विट करून मल्लिकार्जुन खरगे यांचे अभिनंदन केले आहे. काँग्रेस अध्यक्षपद मिळणे ही सन्मानाची आणि जबाबदारीची बाब असल्याचे त्यांनी लिहिले आहे. मल्लिकार्जुन खरगे यांना या कार्यात पूर्ण यश मिळो. तसेच, या निवडणुकीत 1000 हून अधिक नेत्यांचा पाठिंबा मिळणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in