...त्यामुळे काँग्रेसने राजकीय पक्ष म्हणून नैतिक अधिकारच गमावला!

घटनेतील ‘कलम ३७०’ रद्द करण्याच्या निर्णयावर खर्गे यांनी टीका केल्यानंतर भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला आहे. ‘कलम ३७०’ रद्द केल्याने काय फरक झाला, असे खर्गे यांनी राजस्थानमध्ये म्हटले होते.
...त्यामुळे काँग्रेसने राजकीय पक्ष म्हणून नैतिक अधिकारच गमावला!
Published on

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘कलम ३७०’ रद्द करण्याची भाषा केली आहे. त्यामुळे काँग्रेसने राजकीय पक्ष म्हणून राहण्याचा नैतिक अधिकारच गमावला आहे, असे भाजपने म्हटले आहे.

घटनेतील ‘कलम ३७०’ रद्द करण्याच्या निर्णयावर खर्गे यांनी टीका केल्यानंतर भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला आहे. ‘कलम ३७०’ रद्द केल्याने काय फरक झाला, असे खर्गे यांनी राजस्थानमध्ये म्हटले होते. जर आपला पक्ष अन्य राज्यात असे वक्तव्य करीत असेल तर काँग्रेसला ऐक्य आणि एकात्मतेची शपथ घेतल्याबद्दल काहीच आदर नाही असे स्पष्ट होते, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी म्हटले आहे.

खर्गे यांचे वक्तव्य लज्जास्पद - अमित शहा

आता काँग्रेसने स्वत:ला प्रादेशिक शक्तींचा संचय म्हणावे, असेही प्रवक्त्याने म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही खर्गे यांचे वक्तव्य लज्जास्पद असल्याचे म्हटले होते.

logo
marathi.freepressjournal.in