देशात तेलाचे दर कधी कमी करणार? काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा सवाल

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर आता पश्चिम आशियातील युद्ध सुरू होण्यापूर्वीच्या पातळीवर आले आहेत, तरीही देशात तेलाचे दर स्वस्त का झाले नाही, असा सवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारला केला आहे.
देशात तेलाचे दर कधी कमी करणार? काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा सवाल
देशात तेलाचे दर कधी कमी करणार? काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा सवालसंग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर आता पश्चिम आशियातील युद्ध सुरू होण्यापूर्वीच्या पातळीवर आले आहेत, तरीही देशात तेलाचे दर स्वस्त का झाले नाही, असा सवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारला केला आहे.

जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर कमी होऊनही, जनता पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीसाठी जास्तीचे पैसे का मोजत आहे, असे खर्गे यांनी विचारले. कच्च्या तेलाचे भाव कोसळत आहेत, तरीही पेट्रोल-डिझेल-गॅसचे दर कमी करण्याऐवजी मोदी सरकार लोकांच्या बचतीवर गदा आणत आहे, असे त्यांनी 'एक्स'वरील 'पोस्ट' केलेल्या संदेशात म्हटले आहे.

जेव्हा पश्चिम आशियात युद्ध शिगेला पोहोचले होते, तेव्हा कच्च्या तेलाचा दर १३८ डॉलर प्रति पिंप होता. त्यावेळी पेट्रोल ९४.७७ रुपये आणि डिझेल ८७.६७ रुपये प्रति लिटर होते. कच्च्या तेलाचा दर घसरून ७०.७१ डॉलर प्रति पिंपावर आला आहे. मग मोदी सरकार अजूनही पेट्रोल १०२.१२ रुपये आणि डिझेल ९५.२० रुपये प्रति लिटरने का विकत आहे?, अशी विचारणा त्यांनी केली.

भाजप सरकारकडून जनतेची लूट

भाजप सरकार जनतेची 'लूट' करत आहे. जनतेचा वापर केवळ कर वसूल करण्यासाठी आणि तिजोरी भरण्यासाठी केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in