ममतादीदींनी तोडले धाकट्या भावाशी संबंध; हावडा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून मतभेद

मी त्याला नाकारण्याचा आणि त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे.
ममतादीदींनी तोडले धाकट्या भावाशी संबंध; हावडा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून मतभेद
(संग्रहित छायाचित्र)

कोलकाता : पश्चिम बंगालमधील हावडा लोकसभा मतदारसंघातून प्रसून बॅनर्जी यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिल्याने तृणणूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचे कनिष्ठ बंधू बाबून बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र ममता बॅनर्जी यांनी चक्क आपल्या बंधुंच्या भूमिकेविषयी सखेद आश्चर्य व्यक्त करून नाराजीचा सूर आळविला आहे. निवडणुकीपूर्वी तो एक समस्या निर्माण करतो. मला लोभी लोक आवडत नाहीत. घराणेशाहीच्या राजकारणावर माझा विश्वास नाही की मी त्याला उमेदवारी देईन, असे सांगून ममता बॅनर्जी यांनी बाबून यांच्यावर टीकेची तोफ डागली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, मी त्याला नाकारण्याचा आणि त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे.

ते भाजपमध्ये सामील होऊ शकतात या वर ममता बॅनर्जी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, त्यांना पाहिजे ते करू शकतात. मात्र पक्ष हा अधिकृत उमेदवार प्रसून बॅनर्जी यांच्या पाठीशीच उभा आहे.

दरम्यान, या संबंधात सध्या नवी दिल्लीत असलेल्या बाबून बॅनर्जी यांनी मात्र भाजपमध्ये जाण्याची शक्यता नाकारली, परंतु ते म्हणाले की, हावडा मतदारसंघातून अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत विचार करत आहोत. हावडा लोकसभा मतदारसंघातून उमेदवार निवडल्याबद्दल मी खूश नाही. प्रसून बॅनर्जी ही योग्य निवड नाही. तेथे अनेक सक्षम उमेदवार होते ज्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असाही दावा त्यांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in