

नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या ‘१०, जनपथ’ या निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये विरोधी पक्षांची आघाडी अधिक मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.
पश्चिम बंगालमधील नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
तृणमूलमधील या मोठ्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांची पुढील रणनीती काय असावी, यावर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.