NRC हाच SIR मागील खरा हेतू; ममता बॅनर्जींची जोरदार टीका

मतदार याद्यांच्या विशेष फेरतपासणी मोहिमेमागे (एसआयआर) राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) हा खरा हेतू असल्याची जोरदार टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी केली.
NRC हाच SIR मागील खरा हेतू; ममता बॅनर्जींची जोरदार टीका
NRC हाच SIR मागील खरा हेतू; ममता बॅनर्जींची जोरदार टीका छायाचित्र : एएनआय
Published on

कोलकाता : मतदार याद्यांच्या विशेष फेरतपासणी मोहिमेमागे (एसआयआर) राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) हा खरा हेतू असल्याची जोरदार टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी केली.

पश्चिम बंगालमध्ये संविधान दिनानिमित्त रेड रोडवर सभेत त्या म्हणाल्या की, आज जेव्हा लोकशाही आणि धर्मावर हल्ला होत आहे आणि नागरिकत्व, मतदानाच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत, तेव्हा आपण स्वतःला विचारले पाहिजे की, आता आपल्याला आपल्या नागरिकत्वाचा पुरावा द्यावा लागेल का, यामागे ‘एनआरसी’ आहे, आज मी येथे हिंदुस्थानच्या लोकशाहीचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करते, असेही त्या म्हणाल्या.

पुनर्जागरण, क्रान्ती

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आज आपल्याला सत्तेत असलेल्यांच्या दयेने स्वातंत्र्य मिळाले नाही तर, आपल्या स्वातंत्र्यसैनिकांमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांपैकी ९० टक्के लोक बंगाली होते, तर पंजाबनेही यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. हिंदुस्थानात पुनर्जागरण आणि क्रांती घडवून आणणारे बंगाल होते.

त्या म्हणाल्या की, लोकशाही अधिकार हिरावून घेतले जात आहेत आणि सर्वत्र धार्मिक आधारावर फूट पाडली जात आहे. लोकांवर अत्याचार केले जात आहेत, मग ते दलित असो, आदिवासी असो, अल्पसंख्याक असो किंवा हिंदू मतदार असो. ‘एसआयआर’मुळे मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतेक हिंदू होते. आपण सर्व एक आहोत, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in