पश्चिम बंगाल राज्यपालांचा शिक्षण मंत्र्यांवर आरोप

राज्यातील विद्यापीठांमध्ये संभ्रमावस्था असल्याची चर्चा सुरू असतानाच बासू यांनी राज्यपालांवर ते 'वेडसर' असल्याचा शिक्का मारला. शिक्षण मंत्र्यांनीच प्रस्तावित केलेल्या व्यक्तींच्या नावावर आपण अंतरिम कुलगुरू म्हणून आधीच शिक्कामोर्तब केल्यानंतर बासू यांनी ही शेरेबाजी केल्याचे राज्यपालांनी म्हटले आहे.

Published on

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी आपले सौहार्दपूर्ण संबंध आहेत, मात्र राज्याचे शिक्षण मंत्री ब्रत्य बासू या संबंधांमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी केला आहे.

राज्यातील विद्यापीठांमध्ये संभ्रमावस्था असल्याची चर्चा सुरू असतानाच बासू यांनी राज्यपालांवर ते 'वेडसर' असल्याचा शिक्का मारला. शिक्षण मंत्र्यांनीच प्रस्तावित केलेल्या व्यक्तींच्या नावावर आपण अंतरिम कुलगुरू म्हणून आधीच शिक्कामोर्तब केल्यानंतर बासू यांनी ही शेरेबाजी केल्याचे राज्यपालांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in