
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आमदारांच्या पगारात घसघशीत वाढ केल्याची घोषणा केली आहे. पश्चिम बंगाल राज्यातील आमदार, मंत्री यांच्या पगारात थोडी थोडकी नाही, तर तब्बल ४० हजार रुपायांचा वाढ केली आहे. प. बंगालच्या आमदारांना मिळणारं वेतन हे इतर राज्यांच्या तुलने कमी असल्याने त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून स्वत:च्या पगारात मात्र आपण कुठलीही वाढ केली नसल्याचं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं आहे.
पगारवाढ झाल्यानंतर आता प. बंगालच्या आमदारांचा पगार हा १० हजारांवरून थेट ५० हजार एवढा होणार आहे. तर राज्यमंत्र्यांचा पगार १०.९०० वरुन ५०,९०० एवढा होणार आहे. तर कॅबिनेट मंत्र्याचा पगार हा ११ हजारवरुन ५१ हजार होणार आहे. तसंच या आमदारांना मिळणाऱ्या भत्त्यांसह इतर सुविधा या कामम राहणार आहेत.
पगारवाढीनंतर भत्त्यांसह मिळणारी एकूण रक्कम
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आमदारांच्या पगावाढीची घोषणा केल्यानंतर या आमदारांना वाढीव वेतन आणि भत्त्यांसह मिळणारी वास्तविक रक्कम आता ८१,००० रुपये प्रति महिन्यावरुन १.२१ लाख रुपये वर जाणार असल्याची माहिती राज्यसरकारच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर मंत्र्यांना मिळणारी रक्कम १.१० लाखवरुन थेट १,५० लाखांवर जाणार आहे.
पश्चिम बंगालच्या विधानसभेत वाढीव वेतनाची घोषणा करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पं. बंगालच्या आमदारांचे पगार हे इतर राज्यांतील आमदारांच्या पगारापेक्षा खूप कमी आहेत. हे लक्षात घेऊन पगारवाढीला निर्णय घेण्यात आला आहे. तसंच मुख्यमंत्र्यांच्या वेतनात मात्र कोणतीही वाढ करण्यात आली नाही.