पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या कारला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या वर्धमानहून कोलकाता येथे परतत असताना त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात ममता बॅनर्जी जखमी झाल्या आहेत.
खराब हवामानामुळे ममता बॅनर्जी या कारने परतत होत्या. यावेळी त्यांच्या ताफ्यासमोर अचानक एक कार आली. त्यामुळे ममता यांच्या वाहनचालकाला अचानक ब्रेक मारावा लागला. यामुळे हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली असून त्यांना कोलकाता येथे आणले जात आहे. त्या आज दुपारी एका प्रशासकीय आढावा बैठकीसाठी वर्धमान येथे गेल्या होत्या.