फेसबुकवर पंतप्रधान मोदींविरोधात अपशब्द वापरले, गुन्हा दाखल

फेसबुकवर पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे केसरपूर गाव आणि परिसरातील सर्वसामान्य जनतेमध्ये संताप आणि तणाव निर्माण झाला होता...
फेसबुकवर पंतप्रधान मोदींविरोधात अपशब्द वापरले, गुन्हा दाखल

बरेली, उत्तर प्रदेश (पीटीआय) : फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल येथील एका व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी गुरुवारी सांगितले.

केसरपूर गावातील मोहम्मद आबिदने फेसबुकवर पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यामुळे केसरपूर गाव आणि परिसरातील सर्वसामान्य जनतेमध्ये संताप आणि तणाव निर्माण झाला होता, असे पोलिस अधीक्षक (एसपी), ग्रामीण, मुकेश चंद्र, मिश्रा यांनी सांगितले.

ही घटना निदर्शनास आल्यावर मोहम्मद आबिदविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून अटक करण्यासाठी परिसरात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आल्याचे एसपींनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in