तंबाखू न दिल्याच्या रागातून पाच वर्षाच्या पुतण्याला संपवले; जागतिक कर्करोग दिनी धक्कादायक घटना समोर

शनिवारी रात्री रामलाल कोल याने आपल्या मोठ्या भावाची पत्नी सुखीबाई हिच्याकडे तंबाखू मागितली. मात्र, त्यांच्या वहिनीने त्याला तंबाखू नसल्याचे सांगितले. त्यामुळे रामलालला राग आला आणि तो तेथून निघून गेला. काही वेळाने तो कुऱ्हाड घेऊन ...
तंबाखू न दिल्याच्या रागातून पाच वर्षाच्या पुतण्याला संपवले;  जागतिक कर्करोग दिनी धक्कादायक घटना समोर

लोकांमध्ये कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण व्हावी. तसेच त्यांनी व्यसनांपासून दूर जावे, साठी दरवर्षी ४ फेब्रुवारी हा दिवस 'जागतिक कर्करोग दिन' म्हणून साजरा केला जातो. मात्र, आता याच दिवशी मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातून एक दुःखद घटना समोर आली आहे. ३ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील ब्यौहारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बरकाछ गावात तंबाखू न दिल्याने आलेल्या रागातून एका व्यक्तीने आपल्या 5 वर्षांच्या पुतण्याची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. तसेच वहिनीलाही जखमी केले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

तंबाखू न दिल्याने आला राग-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री रामलाल कोल याने आपल्या मोठ्या भावाची पत्नी सुखीबाई हिच्याकडे तंबाखू मागितली. मात्र, त्यांच्या वहिनीने त्याला तंबाखू नसल्याचे सांगितले. त्यामुळे रामलालला राग आला आणि तो तेथून निघून गेला. काही वेळाने तो कुऱ्हाड घेऊन परत आला आणि सुखीबाईच्या घराचा दरवाजा ठोठावू लागला. त्याचा आवाज ऐकूनही तिने दार उघडले नाही, यामुळे तो अधिकच संतापला. रागाच्या भरात त्याने दरवाजा धडक देत आत प्रवेश केला.

झोपेत असलेल्या पुतण्यावर केला हल्ला-

घरात घुसताच त्याने वहिनीवर कुऱ्हाडीने वार करून तिला जखमी केले. यानंतर झोपेत असलेल्या आपल्या ५ वर्षांच्या निष्पाप पुतण्याची कुऱ्हाडीने हत्या केली आणि तेथून पळ काढला. यानंतर त्या मुलाच्या आईचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले आणि बाळाला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत उशिर झाला होता. सुखीबाई ही या हल्ल्यात जखमी झाल्याने तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या-

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी तपासाची सुत्रे हलवत आरोपीला अटक केली असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. आरोपीचा मोठा भाऊ अनेकदा कामानिमित्त घराबाहेर राहतो, असे सांगितले जात आहे. ही घटना घडली त्यावेळीही तो घरी नव्हता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in