

जळगाव : दिल्लीहून त्रिचूर येथे शैक्षणिक सहलीसाठी निघालेल्या काही विद्यार्थ्यांनी भोपाळ रेल्वे स्थानकावर जेवण घेतल्यानंतर २५ ते ३० जणांची प्रकृती बिघडली. यातील ५ ते ६ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यासोबत डॉक्टरांचे पथक सोबत दिले आहे.
ही घटना रेल्वे प्रशासनास कळताच रेल्वे प्रशासनाने भुसावळ स्थानकावर वैदयकीय पथक तैनात करत त्यांना वैदयकीय उपचार व आवश्यक ती औषधे दिली जेवणातून विषबाधा झाली असण्याचा संशय व्यक्त केला आहे. दिल्लीहून त्रिचूर येथे शैक्षणि सहलीसाठी एकूण ९३ विद्यार्थी व १२ शिक्षक मंगला एक्स्प्रेसने निघाले आहेत. यातील २५ ते ३० विद्यार्थ्यांनी भोपाळ रेल्वे स्टेशनवर जेवण घेतले. त्यांना उलटी व मळमळचा त्रास सुरू झाला.