मणिपूरमध्ये पुन्हा तणाव; पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावर हल्ला

अद्यापही केंद्रीय सशस्त्र दले (विशेषतः सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दल) तैनात असल्याचा राग जमावाने व्यक्त केला.
जिल्ह्यातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जिल्ह्यातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. (फोटो: पीटीआय)
Published on

इम्फाळ : मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात जमावाच्या हल्ल्यात पोलीस अधीक्षक जखमी झाल्यानंतर तेथील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. मणिपूरमध्ये तैनात करण्यात आलेले केंद्रीय सशस्त्र दल हटवावे, अशी मागणी कुकी गटांनी केली असून या मागणीची पूर्तता करण्यात अधीक्षक असफल ठरल्याने जमावाने त्यांच्यावर हल्ला केला, असे शनिवारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

जमावाने शुक्रवारी रात्री पोलीस अधीक्षक एम. प्रभाकर यांच्या कार्यालयावर दगडफेक केली. सैबोल परिसरात अद्यापही केंद्रीय सशस्त्र दले (विशेषतः सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दल) तैनात असल्याचा राग जमावाने व्यक्त केला. पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आलेल्या वाहनांची मोडतोड करण्यात आली. जमावातील काहीजणांनी फेकलेली वस्तू एम. प्रभाकर यांच्या कपाळावर लागली आणि त्यामध्ये ते जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in