मणिपूरप्रश्नी राष्ट्रवादीची दिल्लीत निदर्शने

केंद्राने मणिपूरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी वेगाने प्रयत्न केले पाहिजेत, असे काही कार्यकर्त्यांनी सांगितले
मणिपूरप्रश्नी राष्ट्रवादीची दिल्लीत निदर्शने

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने मणिपूरमधील हिंसाचारप्रश्नी सोमवारी दिल्लीतील जंतरमंतर येथे निदर्शने केली.

पक्षाच्या पुणे शहर शाखेचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १०० कार्यकर्ते यावेळी हजर होते. पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांचीही निदर्शनांना उपस्थिती होती. निदर्शनांदरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्याविरोधात घोषणा दिल्या.

आगामी लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतशी केंद्र सरकारविरुद्ध जनतेतील नाराजी वाढत आहे. या निदर्शनांच्या माधयमांतून आम्ही केंद्र सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करत आहोत. केंद्राने मणिपूरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी वेगाने प्रयत्न केले पाहिजेत, असे काही कार्यकर्त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in