मणिपूर व्हिडिओ संबंधित प्रमुख गुन्हेगाराला अटक

गुन्हेगारांची गय न करता त्यांना कठोर शासन दिले जार्इल असे सांगितले
मणिपूर व्हिडिओ संबंधित प्रमुख गुन्हेगाराला अटक

इंफाळ : संपूर्ण देशाला मान खाली घालायला लावणारे मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढून नंतर त्यांच्यावर अत्याचार करण्याचे कृत्य करण्यामागील प्रमुख आरोपीला पोलीसांना अटक केली आहे. ४ मे रोजी घडलेल्या घटनेचा व्हिडिओ बुधवारी व्हायरल केल्याच्या दुसऱ्या दिवशीच मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये हिरवा टी शर्ट घातलेला आणि विवस्त्र महिलेला पकडलेला एक तरुण दिसत असून तोच प्रमुख सूत्रधार आहे. त्याची योग्य ओळख केल्यानंतर अटक करण्यात आली आहे. त्याचे नाव हुर्इरेम हिरोदास मैतेर्इ असे असून तो ३२ वर्षांचा आहे. तो पेची आवांग लेर्इकार्इ गावचा असल्याचे सरकारतर्फे पक्के सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी सरकार गुन्हेगारांवर कडक कारवार्इ करणार असल्याचे सांगतले असून शक्यतो त्याला फाशीची शिक्षा देण्याचा पूर्ण प्रयत्न केला जार्इल असे सांगितले आहे. पंतप्रधान मोदी यांनी देखील गुन्हेगारांची गय न करता त्यांना कठोर शासन दिले जार्इल असे सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in