कारागृहातून लवकरच बाहेर येणार - सिसोदिया

दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, कारागृहातून आपण लवकरच बाहेर पडू, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
कारागृहातून लवकरच बाहेर येणार - सिसोदिया

नवी दिल्ली : आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी तिहार कारागृहातून जनतेला उद्देशून एक पत्र लिहिले आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी कारागृहात ब्रिटिशांकडून ज्या नरकयातना भोगल्या तशीच आपली अवस्था असल्याचे सिसोदिया यांनी म्हटले आहे.

दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, कारागृहातून आपण लवकरच बाहेर पडू, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला ही आपली प्रेरणास्थाने आहेत, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in