माफी मागा, अन्यथा सोसायटी सोडा; मणिशंकर अय्यर यांच्या लेकीला घर सोडण्याची नोटीस

ज्येष्ठ काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची कन्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या विरोधात कृती करणे व विरोधासाठी उपोषण करणे महागात पडले आहे.
माफी मागा, अन्यथा सोसायटी सोडा; मणिशंकर अय्यर यांच्या लेकीला घर सोडण्याची नोटीस

नवी दिल्ली : ज्येष्ठ काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची कन्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या विरोधात कृती करणे व विरोधासाठी उपोषण करणे महागात पडले आहे. मणिशंकर अय्यर यांच्या कन्या सुरन्या अय्यर ज्या सोसायटीमध्ये राहातात त्या सोसायटीने त्यांना माफी मागा, अन्यथा सोसायटी सोडा अशी नोटीस बजावली आहे.

५०० वर्षानंतर प्रभू रामचंद्र गर्भगृहात विराजमान झाले आहेत. सर्वसामान्यांच्या या भावना असताना सुरन्या अय्यर यांचे वर्तन बिलकुल या विरोधात आहे. काँग्रेसचे दिग्गज नेत्याची मुलगी सुरन्या अय्यरने राम मंदिर निर्माणाच्या विरोधात तीन दिवसाच व्रत ठेवले होते. यामुळे नाराज सोसायटीने माफी मागा अन्यथा सोसायटी सोडा अशी नोटीस सुरन्या अय्यर यांना बजावण्यात आली आहे. सुरन्या अय्यर यांनी राम मंदिरातील बांधकामाविरोधात तीन दिवसांचं उपोषण केले होते. तसेच त्यांनी सनातन धर्माविरोधात फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यामुळे सुरन्या अय्यर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. या कृतीमुळे सुरन्या यांच्याविरोधात जंगपुरा येथील सोसायटीच्या आरडब्ल्यूएने कारवाई केली आहे. आरडब्ल्यूने नोटिस पाठवून माफी मागण्यास सांगितले आहे. आरडब्ल्यूएने सांगितले की, या प्रकरणी दोघांनीही सार्वजनिकरीत्या माफी मागावी, अन्यथा सोसायटी सोडून निघून जावे. मणिशंकर अय्यर यांच्या कन्या सुरन्या ह्या दिल्लीतील जंगपुरा परिसरात राहतात. सोसायटीने केलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सुरन्या यांनी फेसबुकवर लिहिले की, माझे वक्तव्य माझ्या उपोषणाबाबत एका टीव्ही स्टोरीशी संबंधित होते. सर्वप्रथम संबंधित रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशन ज्या कॉलनीमधील आहे, तिथे मी राहतच नाही. दुसरी बाब म्हणजे मी सध्या प्रसारमाध्यमांशी न बोलण्याचा निर्णय घेतला आहे. कारण भारतामध्ये प्रसारमाध्यमे सध्या केवळ विष आणि भ्रम पसरवण्याचे काम करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in