

नवी दिल्ली : जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडू नये. तुम्ही एकदा ही जागा सोडलीत तर सरकार तुमचे आंदोलन मोडून काढेल, असा सल्ला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मनोज जरांगे यांनी बुधवारी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरु असलेल्या आंदोलनस्थळी जाऊन कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपके यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी मनोज जरांगे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून मी इथे आलो आहे. भाजप सरकार प्रत्येकवेळी गोरगरीब लोकांच्या लेकरांवर अन्याय करते. या पुढच्या काळात सरकारने विद्यार्थ्यांवर हात उचलला तर यांचे महारष्ट्रातील फिरण पूर्ण बंद होणार आणि यांचा माज पूर्ण उतरवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.