सहा कंपन्यांच्या बाजारमूल्यात कोटींची घसरण,टीसीएसचे सर्वाधिक नुकसान

टीसीएसचे मूल्य सर्वाधिक ९९,२७०.०७ कोटींनी घसरुन १०,९५,३५५.३२ कोटी रुपये झाले
सहा कंपन्यांच्या बाजारमूल्यात कोटींची घसरण,टीसीएसचे सर्वाधिक नुकसान

गेल्या आठवड्यात दहा पैकी सहा कंपन्यांच्या बाजारमूल्यात १.६८,२६०.३७ कोटींची घसरणझाली. आयटीतील आघाडीची कंपनी टीसीएसचे सर्वाधिक नुकसान झाले. दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स गेल्या आठवड्यात ७२१.०६ अंक किंवा १.३२ टक्के घसरला. टीसीएसचे मूल्य सर्वाधिक ९९,२७०.०७ कोटींनी घसरुन १०,९५,३५५.३२ कोटी रुपये झाले. कंपनीचा तिमाही निकाल अपेक्षेप्रमाणे न लागल्याने टीसीएसच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. याशिवाय, आणखी एक आयटी कंपनी इन्फोसिसच्या बाजारमूल्यात ३५,१३३.६४ कोटींनी घट होऊन ६,०१,९००.१४ कोटी रुपये झाले. दहा कंपन्यांच्या क्रमवारीत रिलायन्स इंडस्ट्रीजने अव्वल स्थान कायम ठेवले आहे. त्यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, एलआयसी, एसबीआय, एचडीएफसी आणि आयटीसी यांचा क्रम लागतो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in