अल्पवयीन मुलीचे लग्न; सात जणांना अटक

हा विवाह मानपूर येथील एका मंदिरात २९ नोव्हेंबर २०२३ रोजी संपन्न झाला होता.
अल्पवयीन मुलीचे लग्न; सात जणांना अटक
Published on

इंदोर : येथील म्हाउ येथे १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे लग्न लाउन दिल्या प्रकरणी रविवारी पोलिसांनी सात जणांना अटक केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तक्रार आल्यानंतर महिला व बालविकास विभागाचे अधिकाऱ्यांनी तपास केला. तेव्हा म्हाउ येथे १५ वर्षांचा मुलीचा २४ वर्षाच्या मुलाशी विवाह लावून देण्यात येत असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर मानपूर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी कारवार्इ करुन सात जणांना अटक केली, अशी माहिती पोलिस अधिकारी अरुण सोळंकी यांनी दिली. हा विवाह मानपूर येथील एका मंदिरात २९ नोव्हेंबर २०२३ रोजी संपन्न झाला होता. पोलिसांनी मुलीच्या संदर्भातील कागदपत्रे हस्तगत केली. त्यानंतर तक्रार योग्य असल्याचे आढळले. तेव्हा बालविवाह प्रतिबंद कायद्याअंतर्गत कारवार्इ करुन संबंधितांना अटक करण्यात आली .

मुलीचे पालक,वर, वरपिता, आणि पुरोहित यांना अटक करण्यात आली आहे. आणखी दोघांची या प्रकरणी आरोपी म्हणून नोंद करण्यात आली आहे. बालविवाह गुन्ह्यात दोन वर्षांच्या खडतर कारावासाची सजा किंवा १ लाख रुपये अथवा दोन्ही सजा देण्याची तरतूद आहे.

logo
marathi.freepressjournal.in