Mask Compulsory : काय पुन्हा एकदा मास्क ? महाराष्ट्रामध्ये काय आहे कोरोनाची स्थिती ?

गेल्या 24 तासांत दिल्लीत 2146 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 180 दिवसांतील बळींची ही सर्वाधिक संख्या आहे.
Mask Compulsory : काय पुन्हा एकदा मास्क ? महाराष्ट्रामध्ये काय आहे कोरोनाची स्थिती ?
ANI

दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर मास्क पुन्हा एकदा अनिवार्य करण्यात आले आहेत. मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड आकारला जाण्याची शक्यता आहे. दिल्लीत कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मास्क अनिवार्य करण्यात आले आहेत. दिल्लीत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या वाढीने डोके वर काढले आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे पुन्हा एकदा सक्तीचे करण्यात आले आहे. एएनआयने याबाबतचे वृत्त दिले आहे. दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने यासंदर्भात निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे कारमधून प्रवास करणाऱ्यांना मास्क अनिवार्य नाही. लोक मास्कशिवाय कारमधून प्रवास करू शकतात. मात्र सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य असणार आहेत.

गेल्या 24 तासांत दिल्लीत 2146 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 180 दिवसांतील बळींची ही सर्वाधिक संख्या आहे. मंगळवारी दिल्लीत 2495 कोरोना रुग्ण आढळले.

दिल्लीमध्ये ओमिक्रॉनच्या बीए फोर आणि बीए फाइव्ह उप-प्रकारांची रुग्णसंख्या नोंदवली गेली आहेत. त्यामुळे दिल्लीत संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र लिहून खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या होत्या. दरम्यान, गेल्या 24 तासांत 16 हजार 299 कोरोना रुग्णांची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नोंदवली आहे. देशाचा सकारात्मकता दर 5.58 आहे. दिल्लीतील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातही सतर्क राहण्याचा इशारा दिला जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in