अदानी समूहाने मोठ्या प्रमाणावर कर्ज; फिच ग्रुपचा अहवाल प्रसिद्ध

परिस्थिती बिघडल्यास समूहातील एक किंवा अधिक कंपन्यांसाठी आर्थिक संकट किंवा डिफॉल्ट होऊ शकतो.
अदानी समूहाने मोठ्या प्रमाणावर कर्ज; फिच ग्रुपचा अहवाल प्रसिद्ध

भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत गौतम अदानी यांचे बंदर ते वीज - सिमेंट अशा अनेक उद्योग क्षेत्रात साम्राज्य असले तरी अदानी समूहाने मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतल्याचे म्हटले आहे. क्रेडिटसाइट्स या फिच ग्रुपच्या युनिटने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात समूह या कर्जाचा वापर सध्याच्या आणि नवीन व्यवसायांमध्ये आक्रमकपणे गुंतवणूक करण्यासाठी करत आहे. अदानी ग्रुप : ‘डीप्ली ओव्हरलेव्हराग्ड’ या नावाने जाहीर केलेल्या अहवालात क्रेडिटसाइट्सने म्हटले आहे की, परिस्थिती बिघडल्यास समूहातील एक किंवा अधिक कंपन्यांसाठी आर्थिक संकट किंवा डिफॉल्ट होऊ शकतो.

अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये यंदा मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीतही वाढ होत असल्याचे सांगण्यात येते. अदानी समूहाची सुरुवात १९८०च्या दशकात कमोडिटी व्यापारी म्हणून झाली. आणि नंतर खाणी, बंदरे आणि पॉवर प्लांट्स, विमानतळ, डेटा सेंटर आणि संरक्षण यांसारख्या क्षेत्रात प्रवेश केला. अलीकडेच, समूहाने १०.५ अब्ज डॉलर्समध्ये Holcimचे भारतीय युनिट्स विकत घेऊन सिमेंट क्षेत्रासह अल्युमिन उत्पादनात प्रवेश केला. अहवालानुसार, अदानी समूहाने गेल्या काही वर्षांत आक्रमक विस्तार योजना राबवली आहे. त्यामुळे कर्ज आणि रोख प्रवाहावर दबाव आला आहे. क्रेडिटसाइट्सने म्हटले आहे की, “अदानी समूह वेगाने नवीन आणि वैविध्यपूर्ण व्यवसायांमध्ये प्रवेश करत आहे, ज्यात खूप भांडवल आहे. त्यामुळे देखरेख स्तरावर अंमलबजावणीचा धोका वाढला आहे.” अहवालात म्हटले आहे की, समूह कंपन्यांमध्ये प्रवर्तक इक्विटी भांडवल ओतण्याचे भक्कम पुरावे असताना पर्यावरणीय, सामाजिक आणि परिचालन (ESG)स्तरावरदेखील अदानी समूहाला काही धोका आहे.

अदानी समूहाकडे अदानी एंटरप्रायझेसच्या माध्यमातून कार्यरत कंपन्यांचा मजबूत 'ट्रॅक रेकॉर्ड' आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या कामकाजाशी संबंधित पायाभूत सुविधांचा एक पोर्टफोलिओ देखील आहे. देशांतर्गत स्टॉक एक्स्चेंजवर अदानी समूहाच्या सहा सूचीबद्ध कंपन्या आहेत आणि त्यांच्या काही समूह संस्थांकडे अमेरिकन डॉलर बॉण्ड्सची थकबाकी देखील आहे. या सहा सूचीबद्ध समूह कंपन्यांवर २०२१-२२मध्ये २,३०९ अब्ज रुपयांचे कर्ज होते. निव्वळ कर्ज, समूहाकडे उपलब्ध रोख रक्कम घेतल्यानंतर,१,७२९ अब्ज रुपये होते.

सर्वसाधारणपणे, समूह विद्यमान आणि नवीन युनिट्समध्ये आक्रमकपणे गुंतवणूक करत आहे, असे अहवालात म्हटले आहे. या गुंतवणुकीला मुख्यत्वे कर्जाच्या माध्यमातून वित्तपुरवठा केला जात आहे. त्यामुळे वाढत्या कर्जासह उत्पन्न प्रवाह/कर्जाचे प्रमाण वाढले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in