जबलपूर येथील खासगी रुग्णालयात भीषण आग; १० जणांचा आगीत मृत्यू

मध्य प्रदेशातील दमोह नाका शिवनगर येथील न्यू लाइफ मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आग लागली
जबलपूर येथील खासगी रुग्णालयात भीषण आग; १० जणांचा आगीत मृत्यू

मध्य प्रदेशातील जबलपूर येथील खासगी रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर लागलेल्या भीषण आगीत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये बहुतांश रुग्णालयातील कर्मचारी आहेत. मध्य प्रदेशातील दमोह नाका शिवनगर येथील न्यू लाइफ मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तेथे उपस्थित असलेल्या लोकांनाही बाहेर काढण्यात येत आहे. या आगीत अर्धा डझनहून अधिक लोक जळाले आहेत, तसेच अनेक रुग्णही आगीत जळाल्याची माहिती मिळत आहे. आगीमुळे रुग्णालयात बराच वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रुग्णालयातून सुमारे सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in