हैदराबादमधील केमिकल गोदामात भीषण आग; 6 जणांचा होरपळून मृत्यू तर ६ जणांवर उपचार सुरु

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी राव यांनी नामपल्ली या आगीत मृत्यू झालेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आहे.
हैदराबादमधील केमिकल गोदामात भीषण आग; 6 जणांचा होरपळून मृत्यू तर ६ जणांवर उपचार सुरु
Published on

देशभरात सध्या आगी लागण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. प्रत्येक दोन, तीन दिवसांनी कुठेना कुठे आग लागत आहे. अशातचं आता दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर हैदराबादमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. हैदराबाद येथील केमिकल गोदामाला आग लागून 2 महिलांसह 6 जणांचा मृत्यू झाला आहे. ही आग इतकी भीषण होती की, काही वेळातच या आगने भीषणरूप घेतले.

सेंट्रल झोनचे डीसीपी व्यंकटेश्वर राव यांनी या घटनेसंदर्भात माहिती देताना म्हटले आहे की, हैदराबाद येथील बाजारघाट, नामपल्ली येथील एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या गोदामाला लागलेल्या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यामध्ये 2 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. तर 16 जण किरकोळ जखमी झालेले आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी राव यांनी नामपल्ली या आगीत मृत्यू झालेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान, अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवत आहेत. डीजी (अग्निशमन सेवा) नागी रेड्डी यांनी सांगितलं आहे की, "इमारतीमध्ये केमिकल्सचा बेकायदेशीररीत्या साठा करण्यात आला असावा. इमारतीच्या स्टिल्ट एरियामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्सचा साठा करण्यात आला होता आणि याच केमिकल्समुळे आग लागली होती. या भीषण आगीतून एकूण 21 जणांना बाहेर काढण्यात आलं, त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 6 जणांवर उपचार सुरू आहेत. सर्व लोकांना अपार्टमेंटमधून बाहेर काढण्यात आलं आहे."

logo
marathi.freepressjournal.in