दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या एंडोस्कोपी कक्षाला भीषण आग ; रुग्णांना तात्काळ काढले बाहेर

यानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.
दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या एंडोस्कोपी कक्षाला भीषण आग ; रुग्णांना तात्काळ काढले बाहेर

दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयाचा भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. पीपीटी आय वृत्त संस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. यात दिल्लीतील एम्स रुग्लालयाला आग लागल्याची माहिती देण्यात आली आहे.

प्राप्त माहिती नुसार दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या एंडोस्कोपी कक्षात ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या त्या ठिकाणी तात्काळ दाखल झाल्या. यानंतर रुग्णालयातील सर्व रुग्णांना तात्काळ बाहेर काढण्यात आल आहे. तसंच इतर लोकांना देखील बाहेर काढण्यात आलं आहे.

अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यसाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आज ११:५४ वाजेच्या सुमारास ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. आग नेकमी कशामुळे लागली याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

एम्स हे देशातील महत्वाचं रुग्णालय असुन यात देशभरातील रुग्ण उपचार घेत असतात. त्याच बरोबर विदेशातून देखील रुग्ण याठिकाणी उपचारासाठी दाखल होता. या रुग्णालयात दररोज सुमारे १२ हजार एवढ्या रुग्णांवर उपचार सुरु असतो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in